Wednesday, August 21, 2013

Nagpur University Winter 2013 Engineering Exam From 10 October ?

Nagpur University Winter 2013 Engineering Exam From 10 October ?


RTMNU Winter 2013 Exam Dates | Nagpur University Winter 2013 Timetable | RTMNU October 2013 Exam Timetable | BE Winter 2013 Timetable RTMNU.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या हिवाळी परीक्षांना १२ नोव्हेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु या परीक्षा 'प्री-पोन'करण्यात येऊन त्या १0 ऑक्टोबरच्या आसपास सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.
अभियांत्रिकीच्या परीक्षांसंदर्भात नुकतीच परीक्षा भवनात बैठक झाली. अभियांत्रिकी महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र १५ सप्टेंबरपर्यंतच संपेल व त्यानंतर दोन महिने विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा करावी लागेल. यापेक्षा जर १0 ऑक्टोबरपर्यंतच परीक्षा सुरू झाल्या तर पुढील सत्रासाठीदेखील ते फायदेशीर ठरेल, अशी भूमिका अनेक वरिष्ठ प्राध्यापकांनीदेखील मांडली आहे. कमीतकमी १0 ऑक्टोबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा जरी सुरू झाल्या तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होईल, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परीक्षा विभागातील अधिकार्‍यांनीदेखील याला होकार दिला असून लवकरच यासंबंधीची माहिती जाहीर करण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. जर असे झाले तर विद्यापीठातील एक नवीन 'ट्रेन्ड' ठरेल.

Source : Local News Press 

No comments:

Post a Comment